Police Patil Bharti 2023 – 2024




जिल्ह्यातील रिक्त असलेल्या ९१२ पोलीस पाटील पदांसाठी गुरुवारी (७ डिसेंबर) आरक्षण सोडत होणार असून, जिल्ह्यासाठी १ हजार ४९१ पोलिस पाटील पदाच्या जागा मंजूर आहेत. विविध कारणांमुळे पोलीस पाटील पदांची प्रक्रिया घडली होती. जिल्ह्यातील सर्वाधिक पारनेर तालुक्यातील १२५ पोलिस पाटील पदे रिक्त आहेत. पोलीस पाटील पदासाठी गुरुवारी आरक्षण सोडत होणार आहे. पारनेर, कर्जत, जामखेड, पाथर्डी, श्रीगोंदे, शेवगाव, नगर, नेवासे, श्रीरामपूर, राहुरी, कोपरगाव, राहाता, संगमनेर, अकोले या तालुक्यातील रिक्त पोलीस पाटील पदासाठी ही आरक्षण प्रक्रिया राबविण्यात येणार असून, २०१३-१४ मध्ये संगमनेर, श्रीरामपूर उपविभागात पोलिस पाटील पदाची भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. तसेच या भरतीचे संपूर्ण अभ्यासक्रम व परीक्षेचे पेपर्स सोडवण्यासाठी येथे क्लिक करा 

आरक्षणातील संभ्रम, कोरोना. आचारसंहिता अशा विविध कारणांमुळे जिल्ह्यातील पोलीस पाटील भरती प्रक्रिया गेल्या दहा वर्षांपासून रखडली होती. राज्य शासनाने पोलीस पाटील भरतीस परवानगी दिल्याने जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील ४७६ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या जागांसाठी गुरुवारी (ता. ७) आरक्षण सोडत काढली जाणार आहे. अकोले, संगमनेर, नगर, नेवासे, पाथर्डी आणि शेवगाव या तालुक्यांचा त्यात समावेश आहे. पोलीस पाटील भरती प्रक्रियेमध्ये कोणत्या समाजाला आरक्षण द्यायचे, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे पोलिस पाटील पदाची भरती रखडली होती. सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचे आरक्षण रद्द केले. कोरोना संसर्ग आजाराची साथ २०१९ मध्ये आली.


सर्वत्र लॉकडॉऊन करावे लागले. त्यानंतर पुन्हा दुसरी कोरोनाची साथ आली. या दोन्ही साथी नियंत्रणात आणण्यासाठी शासकीय पातळीवरील भरती, बदली प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. अशा विविध कारणांनी पोलिस पाटील भरती प्रक्रिया रखडली होती.

पोलिस पाटलांच्या प्रमुख मागण्या

– निवृत्तीचे वय ६० वरून ६५ करावे

– निवृत्तीनंतर १० लाख रुपये रोख द्यावेत

– स्वसंरक्षणासाठी बंदूक परवाना द्यावा

– मानधन सहा हजार ५०० वरून १५ हजार करावे

– १० वर्षांनी होणारे नूतनीकरण पद्धत बंद करावे

– ग्राम पोलिस अधिनियम कायदा १९६७ मध्ये दुरुस्ती करावी


पोलिस पाटलांच्या.

 रिक्त पदांमुळे अनेक गावात कायदा व सुव्यवस्था टिकविण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. कार्यरत पोलिस पाटलांचे मानधन व वयोमर्यादेत वाढ यासह अनेक मागण्या प्रलंबित आहेत. महाविकास आघाडीच्या कार्यकाळात यावर निर्णय झाला होता; परंतु सरकार बदलताच पुढील कार्यवाही झाली नाही. सरकारने आतातरी रिक्त पदे भरण्यासोबतच प्रलंबित मागण्या मार्गी लावण्यासाठी पावले उचलावीत.

 

अर्जदारासाठी नियम

•अर्जदारचे वय २५ पेक्षा कमी व ४५ वर्षांपेक्षा जास्त नसावे.

•शैक्षणिक पात्रता इयत्ता १० वी उत्तीर्ण.

•अर्जदार त्याच गावातील स्थानिक रहिवासी असावा.

•अर्जदार शारीरिक दृष्ट्या सक्षम असावा.

•कोणत्याही गुन्ह्यात दंड अगर शिक्षा झालेली नसावी.

•ज्या प्रवर्गासाठी हे पद भरण्यात येणार आहे अशा प्रवर्गातील व्यक्तीनेच अर्ज करणे बंधनकारक.

•अर्जदार सरकारी थकबाकीदार नसावा.

•अर्जदारास मराठी भाषेचे ज्ञान असणे अनिवार्य आहे.

•अर्जदार कोणत्याही राजकीय पक्षाचा अथवा संघटनेचा पदाधिकारी, सदस्य नसावा.


नुकत्याच आरक्षण सोडत झालेल्या Police Patil recruitment पोलिस पाटील पदांच्या अर्ज सादर करण्याच्या तारीख व भरती प्रक्रियेबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. यावर विश्वास न ठेवता उपविभागीय कार्यालयाच्या निर्देशानुसार येत्या काही दिवसांत जाहिरामा प्रसिद्ध केल्यानंतर पदभरतीचा कार्यक्रम जाहीर करून पारदर्शक आणि शिस्तबद्धपणे राबविली जाईल, नागरिकांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन उपविभागीय अधिकारी वरुणकुमार शहारे यांनी केले आहे



बीड जिल्ह्यातील डोंगरी‎ विभागाअंतर्गत राहिलेल्या गावांचे‎ प्रस्ताव तातडीने निकाली काढावेत‎ त्याचबरोबर जिल्ह्यातील पोलीस‎ पाटलांच्या रिक्त जागा तातडीने‎ भरण्यात याव्यात संजय गांधी श्रावण‎ बाळ योजना बीड तालुक्याची नवीन‎ समिती अस्तित्वात आल्याशिवाय‎ बैठक घेऊ नये तसेच २०१९ पासून ची‎ जुनी प्रकरणे तात्काळ निकाली‎ काढण्यात याव्यात बीड तहसीलमध्ये‎ बीड तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे‎ फेरफार प्रकरणे मंजूर करण्यात यावी,‎ बीड जिल्ह्यातील १६०० पोलीस‎‎ पाटलांच्या जागा आहेत परंतु प्रत्यक्षात‎ ११४ पोलीस पाटील कार्यरत आहेत‎ जिल्ह्यात १४८४ पोलीस पाटलांच्या‎ जागा रिक्त असून शासनाच्या‎ सूचनेनुसार या जागा तात्काळ भरण्यात‎ याव्यात जेणेकरून जिल्ह्यातील‎ कायदा व सुव्यवस्था योग्य राहील‎ आणि ग्रामीण भागातील पोलीस‎ यंत्रणेला मदत होईल यासाठी या जागा‎ भरणे आवश्यक असल्याचे माजी मंत्री‎ जयदत्त क्षीरसागर यांनी दोन‎ दिवसापूर्वी जिल्हाधिकारी शर्मा यांची‎ भेट घेऊन सांगितले त्यानंतर‎ जिल्हाधिकारी शर्मा यांनी पोलीस‎ पाटलांच्या ९४५ पदांच्या भरतीसाठी‎ कारवाई करण्याचे आदेश दिले असून‎ ही पदे तात्काळ भरण्यात येणार आहेत.‎

येत्या १५ फेब्रुवारीला‎ जाहिरात प्रसिद्ध होईल‎

पोलिस पाटलांच्या रिक्त पदांच्या‎ भरतीसाठी येत्या १५ फेब्रुवारी‎ २०२२ रोजी या संदर्भात जाहिरात‎ प्रसिद्ध होणार असून अर्जाची‎ छाननी, लेखी परीक्षा आणि पात्र‎ उमेदवारांच्या तोंडी परीक्षा अशी‎ सर्व प्रक्रिया मार्च अखेर पूर्ण‎ होणार असून जिल्ह्यातील सर्व‎ रिक्त पदांवर पोलीस पाटलांच्या‎ नियुक्ती करण्यात येणार असुन‎ या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी हे‎ आदेश काढले आहेत.
 



पुढे माहिती साठी माझा पेज कॉलो करा.........


Comments