१० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठी संधी! कर्मचारी निवड आयोगात १५५८ पदांसाठी भरती सुरु, आजच करा अर्ज

कर्मचारी निवड आयोगाने मल्टी टास्किंग स्टाफ आणि हवालदार पदांसाठीच्या एकूण १५५८ जागांसाठीची भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ जुलै २०२३ आहे. तर स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती २०२३ साठीची आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण आणि अर्जाची फी याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया. स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती २०२३ – पदाचे नाव – मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल स्टाफ) हवालदार (CBIC & CBN) एकूण रिक्त पदे – १५५८ पदाचे नाव व रिक्त पदे – मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल स्टाफ) – ११९८ हवालदार – ३६० शैक्षणिक पात्रता – १० वी पास किंवा समतुल्य. वयोमर्यादा – खुला प्रवर्ग – मल्टी टास्किंग स्टाफ – १८ ते २५ वर्षे. हवालदार पदासाठी १८ ते २७ वर्षे. मागासवर्गीय प्रवर्गासाठी ५ वर्षे सूट, तर ओबीसींसाठी ३ वर्ष सूट. अर्ज शुल्क – खुला/ ओबीसी प्रवर्ग – १०० रुपये. मागासवर्गीय/ माझी सैनिक/ PWD यांना अर्ज शुल्क नाही. नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत. महत्वाच्या तारखा – ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – ३० जून ...